Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, मोकारपंती ग्रुपवर दाखवले छळाचे लाइव्ह व्हिडीओ
Saam TV March 06, 2025 02:45 PM
योगेश काशिद, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्राकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता. संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर लाइव्ह व्हिडीओद्वारे दाखवला. एकदा नाही तर तब्बल ४ वेळा आरोपींनी व्हिडीओ कॉल केला असल्याचे समोर आले आहे. मोकारपंती ग्रुपवर व्हिडीओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे. कृष्णा आंधळेने चार वेळा व्हिडिओ कॉल केला होता.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नव नविन अपडेट समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष देशमुखांच्या छळावेळी आरोपींनी व्हिडीओ कॉल केले होते. छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याची धक्कादायक माहिती तसापात समोर आली आहे. या व्हिडीओ कॉलचे सर्व डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.

मोकारपंती नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाइव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे. कृष्णा आंधळे याने ४ वेळा मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला होता. मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता. याच व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉल करत होता.

कृष्णा आंधळेने ४ वेळा केला होता मोकारपंती ग्रुपवर व्हिडिओ कॉल -

1) पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5 वाजून 14 मिनिट , 44 सेकंद (कॉल ड्युरेशन 17 सेकंद)

2) दुसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 16 मिंट 45 (कॉल ड्यूरेशन 17 सेकंद)

3) तिसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 19 मिनिट (कॉल दुरेशन 2.03 मिनिट)

4) चौथा व्हिडिओ कॉल 5 वाजून 26 मिनिट 20 सेकंद (2.44 मिनिट)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.