मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात याच मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा मविआच्या नेत्यांनी दिला होता. पण आता फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकड पोलिसांकडून केली जातेय.
Rahul Gandhi News : राहुल गांधी आज मुंबईतधारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी येथे भेट देणार आहेत. आज ते मुंबईत येणार असून धारावीला भेट देतील.
MVA NEWS : महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठकविधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला गेल्या तीन दिवसात विविध मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वड्डेटीवर यांच्या उपस्थितीत होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ही बैठक सायंकाळी 4 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.
Manikrao Kokate News : कोकाटेंवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढणार?अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली असलीतरीही त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची आज लावून धरली जाऊ शकते.
Maharashtra Budget Session News : आजच्या चौथ्या दिवशीही विधीमंडळाचे तापमान वाढणारराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी सुरू झाले असून ते 26 मार्च रोजी संपणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करतील. पण आजच्या चौथ्या दिवशीही . अबू आझमी निलंबन आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.