बिहारमधील अवघ्या 25 अनुराग कुमारची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) वैज्ञानिक सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे.
अररिया जिल्ह्यातील बागुलहा गावचा रहिवासी असलेल्या अनुरागला मिळालेल्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
शेतकरी कुटुंबातील अनुरागने अभ्यासाच्या जोरावर इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनून गावासह संपूर्ण जिल्ह्याचं नावं मोठं केलं आहे.
वयाच्या 25 व्या वर्षी एवढं मोठं यश मिळवून तो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.
त्याचे वडील मनोज कुमार यांनी सांगितलं की, तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. तर त्याच्या यशामागे दिवंगत आजोबांचा मोठा वाटा आहे.
"आजोबांनी त्याला लहानपणापासूनच शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ते जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता"; असं ते म्हणाले.
अनुरागचे प्राथमिक शिक्षण मिथिला पब्लिक स्कूल, फोर्ब्सगंजमध्ये झाले आहे. त्यानंतर ते वनवास हिंदू विद्यापीठात शिक्षणासाठी गेला. तर बनारसमधूनच पदवी मिळवली