प्रत्येक बाजारात हमखास यश : अॅसेट अॅलोकेशन फंडाची भूमिका
esakal March 17, 2025 01:45 PM

धनंजय काळे - संचालक, धनश्री वेल्थ प्रा. लिमिटेड

गुंतवणूकदारांसाठी अधिक महत्त्वाचे काय असते- दीर्घ मुदतीत वाजवी, टिकाऊ परतावा मिळविणे, की आर्थिक तेजीच्या चक्रादरम्यान उच्च परताव्याचा कालावधी अनुभवणे? त्यानंतर आर्थिक आकुंचन किंवा जोखमीनुसार परतावा दडपणाऱ्या भू-राजकीय तणावांमुळे उच्च अस्थिरतेनंतर उच्च अस्थिरतेच्या काळाचा अनुभव घेणे?

सातत्यपूर्ण संपत्तीवृद्धीची निर्मिती करण्यासाठी केवळ उगवते तारे बनू शकणारे शेअर ओळखण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी योग्य अॅसेट अॅलोकेशन (मालमत्ता वितरण) धोरण असणे आवश्यक असते. बाजारपेठ ही चक्रांमध्ये चालत असते- ती आशावादापासून सुरू होते आणि निराशेत संपते, त्यात बुल (तेजी) आणि बेअर (मंदी) हे दोन्ही टप्पे येतात. या चक्रांमध्ये बुल आणि बेअर टप्प्यांच्या कालावधीचा अंदाज बांधणे अत्यंत अनुभवी तज्ज्ञांसाठीदेखील अत्यंत कठीण असते.

समभाग (इक्विटी), रोखे (डेट) यांसारखे विविध मालमत्तावर्ग, सोने, आंतरराष्ट्रीय इक्विटी यांसारख्या कमोडिटीज आणि रिअल इस्टेट हे आर्थिक वातावरण आणि बाह्य व्यापक घटकांमधील परस्परसंबंधांनुसार वेगवेगळ्या प्रकारे वागतात.

बाजारपेठ चक्राचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शाश्वत परताव्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, गुंतवणूकदारांनी मालमत्ता वितरणाला प्राधान्य दिले पाहिजे. समभाग, रोखे आणि सोने यांचा समावेश असलेल्या संतुलित पोर्टफोलिओची आर्थिक चक्राच्या आधारे रचना केली पाहिजे. हे वितरण गतिशील असणे आवश्यक असते, कारण यशस्वी मालमत्तावर्ग काळानुसार बदलतात. दुसऱ्या शब्दांत, वितरणाच्या पुनर्रचनेवर कॉर्पोरेट चक्र, महागाई दर, धोरणात्मक व्याजदर आणि जीडीपी वाढीचा प्रभाव पडायला हवा. उदाहरणार्थ, आर्थिक विस्ताराच्या काळात इक्विटीमधील वितरण वाढते, कारण गुंतवणूकदारांची भावना आशावादाकडून उत्साहाकडे वळते. याउलट, आर्थिक आकुंचनाच्या काळात रोख्यांमधील वितरण वाढले पाहिजे.

बहुतेक वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे आर्थिक चक्रातील बदलांचा अंदाज लावण्याचे कौशल्य नसते. त्यामुळे अॅसेट अॅलोकेशन फंडाची सदस्यता घेऊन ही रणनीती अंमलात आणता येऊ शकते. हे फंड अंतर्गत मॉडेलच्या आधारे विविध वर्गांमध्ये मालमत्ता वितरणाचे समायोजन करतात. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात योग्य मालमत्तेत गुंतवणूक करून गुंतवणुकीचा प्रवास सुरळीत होईल हे सुनिश्चित करतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅसेट अॅलोकेटर फंड (एफओएफ) हा फंड प्रामुख्याने इक्विटी-ओरिएंटेड योजना, डेट-ओरिएंटेड योजना आणि गोल्ड ईटीएफ/योजनांमध्ये इन-हाऊस व्हॅल्यूएशन मॉडेल वापरून वितरण करतो. या फंडाने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत एका वर्षाचा ११.९० टक्के परतावा दिला आहे. त्याचा एकत्रित वार्षिक वाढीचा दर (सीएजीआर) तीन वर्षांत १२.९२ टक्के आणि पाच वर्षांत १३.८७ टक्के आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.