पाकिस्तानात हळू-हळू भारताच्या दुश्मनांचा गेम ओव्हर होत चालला आहे. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या शत्रूंना वेचून वेचून मारलं जातय, भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना कुत्र्यासारख मारलं जातय. पाकिस्तानात असलेल्या भारताच्या कुठल्या शत्रूचा कधी, कुठे गेम होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत हे भारतविरोधी दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत होते. पण आता मात्र त्यांच्यासाठी पाकिस्तानतही सुरक्षित राहिलेला नाही. हाफीज सईदचा भाचा लश्कर-ए-तैयबाचा कमांडर अबू कताल सिंधीची झालेली हत्या हे त्याचच उदहारण आहे. हाफीज सईदवर सुद्धा हल्ला झाला. पण तो थोडक्यात वाचला, जखमी आहे असं बोललं जातय. पाकिस्तानात भारताच्या शत्रुंना अशा प्रकारे कोण वेचून-वेचून मारतय हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
खरंतर अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी इस्रायल हा देश ओळखला जातो. इस्रायल आपल्या शत्रुंना त्यांच्या देशात घुसून अशा प्रकारे संपवतो. आता पाकिस्तानही हेच सुरु आहे. आता या सगळ्यामागे कोण आहे? याचीच चर्चा आहे. अबू कताल सिंधीच्या हत्येनंतर आता पुढचा नंबर कोणाचा? ही चर्चा सुरु झाली आहे. काहीजण हाफिज सईदच नाव घेत आहेत, काही जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच नाव घेत आहेत. आतापर्यंत हाफीज सईद आणि मसूह अजहर या दोघांनी पाकिस्तानात राहून भारताला अनेकदा जखमी केलय. पाकिस्तानी सैन्य आणि ISI च्या इशाऱ्यावर ते हे सर्व करायचे. पण आता त्यांच्यासाठी पाकिस्तान सुरक्षित नाहीय.
ते स्पेशल ऑपरेशन कसं असेल?
मागच्या वर्ष-दीड वर्षात भारतविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना पाकिस्तानात संपवण्यात आलय. या लिस्टमध्ये या दोघांच्या नावाचा कधीही समावेश होऊ शकतो. फक्त ते स्पेशल ऑपरेशन कसं असेल? याचीच उत्सुक्ता आहे.
शाहिद लतीफ
रियाज अहमद
मौलाना जियाउर रहमान
आमिर हमजा (आयएसआयशी संबंध पाकिस्तान आर्मीचा निवृत्त ब्रिगेडियर)
आमिर सरफराज
अदनान अहमद ऊर्फ अबू हंजाला
हंजाला
परमजित सिंह पंजवार
मिस्त्री जहूर इब्राहिम
भारताच्या यादीतील ही काही मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची नाव आहेत, ज्यांना संपवण्यात आलय.
याआधी हाफिज सईद थोडक्यात वाचलेला
हाफिज सईदच्या हत्येचा याआधी सुद्धा प्रयत्न झालाय. अनेकदा हाफिज सईद थोडक्यात बचावला आहे. 23 जून 2021 रोजी लाहोरमध्ये त्याच्या घराच्याजवळ एका पोलीस चेकपॉइंटवर आत्मघातकी हल्लेखोराने कारने धडक दिलेली. यात चार लोक मारले गेले. हल्ल्याच्यावेळी सईद घरी नव्हता.