बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'जॉली एलएलबी' चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही पार्टने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'जॉली एलएलबी'च्या दोन यशानंतर आता 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'जॉली एलएलबी 3'साठी खूप उत्सुक आहेत. अशात आता 'जॉली एलएलबी 3' ची रिलीज डेट समोर आली आहे.
' 3' मध्ये अक्षय कुमार आणि वारसीने (Arshad Warsi) वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोघांनी 'जॉली एलएलबी'च्या पहिल्या दोन पार्टमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना हसायला लावले आहे. आता पुन्हा ही जोडी कोर्टरूममध्ये एकत्र येत आहे. हा चित्रपट यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कुमारचा 'जॉली एलएलबी 3' हा 19 सप्टेंबर 2025ला रिलीज होणार आहे. 'जॉली एलएलबी 3'च्या घोषणेपासून चाहते चित्रपटासाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत होते. 'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचे चित्र सध्या समोर दिसत आहे. 'जॉली एलएलबी ३' चित्रपटाच्या रिलीज डेटची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'जॉली एलएलबी 3' चे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार जॉली मिश्रा आणि अरशद वारसीन जॉली त्यागीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'जॉली एलएलबी 2' हा चित्रपट 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, अन्नू कपूर, हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, सयानी गुप्ता आणि मानव कौल ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. चित्रपटात भन्नाट कॉमेडी पाहायला मिळाली आहे.