इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे.
आयपीएलच्या या १८ व्या हंगामात कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे २३ मार्चला आमने-सामने असणार आहेत.
चेन्नई आणि मुंबई एकमेकांविरुद्ध खेळून हंगामाची सुरुवात करणार आहेत.
चेन्नईचे घरचे मैदान चेपॉक स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.
आत्तापर्यंत चेन्नई आणि मुंबईमध्ये अनेक रोमांचक सामने झाले आहे, पण आत्तापर्यंत कोणाचं पारडं जड राहिलंय जाणून घेऊ.
चेन्नई आणि मुंबई संघात ३७ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १७ सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर २० सामने मुंबईने जिंकले आहेत.
मात्र, असे असले तरी शेवटच्या ५ सामन्यांपैकी ४ सामने चेन्नईने जिंकले आहेत.
दरम्यान, या दोन संघात या हंगामातील दुसरा साखळी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २० एप्रिल रोजी होणार आहे.