काँमेडियन कुणाल कामरा यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात सांगितले. कोण कद्दार आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले.
Nagpur Violence Live: फहीमचे घर महापालिकेनं पाडलंनागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोजर चालवला आहे. संजय पार्क येथील त्यांचे घर अतिक्रमणाता असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Aamir khan met with santosh deshmukh Family : आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या मुलांची भेटबीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यातील जनता करत आहे. तर या मागणीचा पाठपुरावा त्यांचे बंधू धनंजय देशमुख करत आहेत. यादरम्यान आमिर खानने संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. तसेच दोन्ही मुलांचे सांत्वन केले.
Prashant Koratkar News : कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात आज सुनावणीप्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर अटक टाळण्यासाठी कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून आज जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
Nagpur Violence News : नागपूरमधील सर्व भागातून संचारबंदी मागेनागपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवण्यात आली आहे. यामुळे महाल, शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे.
Aaditya Thackeray News : भ्याड टोळीचा हल्ला, मुख्यमंत्र्यांनाही मिंधेंनी कमजोर केलं; कुणाल कामरा प्रकरणावर आदित्य ठाकरेंकडून शिंदेंवर हल्लाबोलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणे केल्याने नवा वाद सुरू झाला असून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कमरावर गुन्हा दाखल झाला असून शिवसेनेनं त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी देखील हल्लाबोल करताना, कामरा यांचे विधान 100 टक्के खरे असल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Kunal Kamra News : कुणाल कामराप्रकरणी संजय राऊतांचं ट्विटस्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. याप्रकरणानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी कुणाल कामराचा स्टुड्ओची तोडफोड केली आहे. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी याबाबत X वर एक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर देवेंद्रजी... तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात, असा टोला लगावला आहे.
Prashant Koratkar News : कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मुधोजी राजे भोसलेंची मागणीप्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल असून तो अद्याप फरार आहे. यादरम्यान कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी केली आहे.
Kunal Kamra News : कुणाल कामरा प्रकरणात शिवसैनिकांवर गुन्हा दाखलएकनाथ शिंदे संदर्भात बदनामीकारक गाणं गायल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली. आता या प्रकरणी खार पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल सरमळकर, राहुल कनाल सह शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagpur Riots News : नागपूर हिंसाचारप्रकरण: न्यायालयीन चौकशी करा, ठाकरे गटाची मागणीनागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. याबाबच नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी निवेदन दिले असून हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांची पोलीसांनी धरपकड करत त्यांना अटक केली आहे. त्यामुळे दोषी सोडून निर्दोषांवर कारवाई होऊ नये, सत्यता तपासली जावी. म्हणून न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Nagpur Violence News : फहीम खानच्या घरावर बुलडोझर? सरकारनं धाडली कुटुंबीयांना नोटीसनागपुरात हिंसाचार प्रकरणी फहीम खान मुख्य आरोपी असून त्याच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर याकारवाईबाबत त्याच्या कुटुंबीयांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
Disha Salian case News : दिशा सालियनच्या वडिलांचा जबाब आज (ता.24) पोलीस नोंदवण्याची शक्यतादिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं असून दिशाचा बलात्कार करून हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहेत. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगले आहे. दरम्यान आज (ता.24) या प्रकरणात मालवणी पोलीस दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.