Rohit Sharma change Intent of Shreyas Iyer and Other Players: काल गुजरात टायटन्स विरूद्ध पंजाब किंग्ज संघाने अवघ्या ११ धावांनी रोहमहर्षक विजय मिळवला. सामन्यात सामनावीर ठरला ३ धावांनी शतक हुकलेला . संपूर्ण षटक शिल्लक होतं, कर्णधार चांगल्या लयमध्ये होता, पण त्याने स्ट्राईक घेऊन शतक पूर्ण केलं नाही. लक्ष्याचा पाठलाग करण्याचाही दबाव नव्हता, मग श्रेयसकडे संधी असूनही तो शतकाच्या मोहात का पडला नाही? याबद्दल नेटकरी म्हणतात की रोहित शर्माने श्रेयस अय्यरला व सर्व खेळाडूंना बिघडवले आहे, पण हे खरं आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
काल संघाचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरने ४२ चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी केली. श्रेयसकडे शतकाची संधी असतानाही त्याने साथीदार शशांक सिंगला मोठे फटके खेळत राहायला सांगितले. श्रेयस नॉन स्ट्राईकला उभा होता, अन् स्ट्राईकला असलेल्या शशांक सिंगने शेवटच्या षटकात ५ चौकारांसह २३ धावा ठोकल्या. याचं २३ धावा पंजाब किंग्ज संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरला. कादाचित श्रेयसने शतक पूर्ण करण्यासाठी छोटे फटके खेळले असते, तर अंतिम षटकात इतकी मोठी धावसंख्या उभी राहू शकली नसती. श्रेयसच्या या निस्वार्थी खेळीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुके होत आहे.
सामन्यानंतर शंशाक सिंगने श्रेयसच्या रणनितीबद्दल सांगितले, 'मी प्रामाणिकपणे सांगतो. मी खेळायला गेलो, तेव्हा पहिल्या चेंडूपासून श्रेयसने मला सांगितले की माझ्या शतकाची चिंता करू नकोस आणि तुझा खेळ कर. शेवटचे षटक सुरू होण्याआधीही त्याने मला खेळण्यास सांगितले. मी चेंडू पाहत होतो आणि फक्त त्यावर प्रतिक्रिया देत होतो. मी चेंडू सीमापार करण्याचा प्रयत्न करत होतो,' शशांक म्हणाला.
श्रेयच्या या निस्वार्थी खेळीवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण रोहित शर्माने भारतीय खेळाडूंना बिघडवून ठेवलं आहे म्हणजेच, निस्वार्थी खेळण्याची सवय लावली असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. श्रेयस अय्यरने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत देखील निस्वार्थी खेळी केल्या. अनेकदा मोठे फटके खेळाताना त्याचे अर्धशक हुकले.
भारतीय संघ सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात बलाढ्य संघ आहे. मागील आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने अवघा एक सामना गमावला आहे. भारतीय खेळाडूंची खेळण्याची पद्धत कर्णधार रोहित शर्माने बदलली असल्याची अनेकांचे मत आहे. कारण रोहित शर्माने २०२३ च्या वर्ल्ड कपपासून कोणतेही माईलस्टोन्स न बाळगता आक्रमक फलंदाजी करत आहे आणि तोच पॅटर्न फॉलो करताना भारतीय खेळाडू दिसत आहेत असे चाहत्यांचे मत आहे.