इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ९ वा सामना २९ मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होत आहे.
हा सामना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे.
हा रोहितचा कारकिर्दीतील ४५० वा टी२० सामना आहे.
रोहित ४५० टी२० सामने खेळणारा जगातील १२ वा खेळाडू, तर पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच भारतीय खेळाडूला ४५० टी२० सामने खेळता आलेले नाहीत.
रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो आयपीएलमध्ये टी२० खेळत आहे.
रोहितने ४५० टी२० सामन्यांपैकी भारतासाठी १५९ सामने खेळले आहेत, तर आयपीएलमध्ये २५९ सामने खेळले आहेत. बाकी ३२ सामने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळले आहेत.
रोहितनंतर २९ मार्चपर्यंत सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक (४१२ सामने) आणि विराट कोहली (४०१ सामने) आहेत.