इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा गुजरातचा घरचा सामना असणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून पुनरागमन झाले आहे. हार्दिक गेल्यावर्षी लागलेल्या एका सामन्याच्या बंदीमुळे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. पण आता तो मुंबईचे सलग दुसऱ्या हंगामात नेतृत्व करताना दिसणार आहे. तसेच या सामन्यासाठी गुजरात संघात फारसा बदल झालेला नाही.
प्लेइंग इलेव्हनमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
इम्पॅक्ट सब्स्टिट्युटसाठी पर्यायमुंबई इंडियन्स : महिपाल लोमरोर, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर
गुजरात टायटन्स : रॉबिन मिन्झ, अश्वनी कुमार, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स
मुंबई आणि गुजरातसाठी हा यंदाच्या हंगामातील हा प्रत्येकी दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, तर गुजरातला पंजाब किंग्सविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं.
त्यामुळे आता मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहेत. त्यामुळे आता कोणाच्या खात्यात पहिल्या विजयाची नोंद होणार आणि कोणाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागणार, हे सामन्यानंतर समजणार आहे.
रोहित शर्मासाठी खास सामनादरम्यान, हा सामना मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज खास सामना आहे. त्याचा हा टी२० क्रिकेट कारकिर्दीतील ४५० वा सामना आहे. तो ४५० टी२० सामना खेळणारा जगातील १२ वा खेळाडू आहे, तर भारताचा पहिलाच खेळाडू आहे.
त्याच्यापूर्वी अद्याप कोणत्याच भारतीय खेळाडूला ४५० टी२० सामने खेळता आलेले नाहीत. त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सध्या दिनेश कार्तिक (४१२ सामने) आणि विराट कोहली (४०१ सामने) आहेत.