केकेआरविरुद्ध पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अश्वनी कुमार आहे तरी कोण? पदार्पणाच्या सामन्यातच चर्चा, जाणून घ्या
GH News April 01, 2025 12:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या अश्वनी कुमारने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या चार खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणाच्या सामन्यात कमाल केल्याने त्याच्या नावाची चर्चा होत आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने संघाचं चौथं षटक अश्वनी कुमारच्या हाती सोपवलं. त्याचं पदार्पणातील हे पहिलंच षटक होतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. 23 वर्षीय या अश्वनी कुमारने या षटकात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. आयपीएल स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा चौथा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज ठरला आहे. अश्वनीपूर्वी अली मुर्तझा, अल्झारी जोसेफ आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी मुंबई इंडियन्ससाठी ही कामगिरी केली होती. अश्वनीला तिलक वर्माने घेतलेल्या जबरदस्त कॅचमुळे यश मिळाले हे विसरून चालणार नाही. सुरुवातीला झेल पकडताना चुकला पण नंतर डीप बॅकवर्ड पॉइंटवर एका हाताने झेल घेतला.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज

  • अली मुर्तझा विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2010 (नमन ओझा)
  • अल्झारी जोसेफ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 2019 (डेव्हिड वॉर्नर)
  • डेवाल्ड ब्रेव्हिस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 2022 (विराट कोहली)
  • अश्वनी कुमार विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 2025 (अजिंक्य रहाणे)

अश्वनी कुमार पंजाबचा मोहाली येथे राहतो. यापूर्वी अश्वनी कुमार प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या आयपीएल पदार्पणाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्याच्याकडून फार अपेक्षा होती आणि त्याने निराश केले नाही. आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी सिनिअर लेव्हलला फक्त चार टी20 सामने खेळला आहे. तर दोन रणजी ट्रॉफी आणि चार लिस्ट ए सामने खेळला आहे. असं असताना पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेऊन त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अश्विनीने 3 षटकात 24 धावा देत 4 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 8 चा होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.