दोघांकडून सदनिकेचा बेकायदा ताबा
भिवंडी, ता.३१ (वार्ताहर)ः कर्जाचे हप्ते भरले नसल्याने शहरातील कणेरी येथील एका सदनिकेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात ठाणे दिवाणी न्यायालयाने सदनिकेचा ताबा मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीला दिला होता. तरी देखील नरेंद्र जखानी त्याचे वडील रामलु जखानी यांनी सदनिकेत बेकायदा प्रवेश केला होता. या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या तक्रारीनंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल आहे.