किन्हवली (बातमीदार)ः डोळखांब येथील व्यावसायिक शिवाजी देशमुख यांच्या निवासस्थानातील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज स्वामी समर्थ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक, पालखी काढण्यात आली. या सोहळ्यात डोळखांब व हेदवली ग्रामस्थ आयोजक सोहळ्यात हनुमान प्रासादिक भजन मंडळ, जांभूळवाड यांनी भजनाची साथ दिली. ३३ वर्षांची परंपरा असलेल्या स्वामी समर्थ जन्मोत्सवात तालुक्यातील विविध मान्यवरांनी सहभाग घेतला होता. यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.