पिंपरी, ता. ३१ : पिंपरी येथील सावित्रीबाई फुले भवनात ख्रिस्ती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये राज्यभरातून लेखक, कवी आणि साहित्यिक प्रेमी सहभागी झाले होते.
ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे संमेलनाचे अध्यक्ष होते. ज्योती सूर्यवंशी यांच्या ‘ख्रिस्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कवी संमेलनात मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे अध्यक्ष पौलस वाघमारे, सचिव सायमन मार्टिन, बांधकाम उद्योजक शिरीष हिवाळे, उद्योजक विश्वास दळवी, अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, कवी किशोर हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी आपले विचार मांडत कवींना प्रोत्साहन दिले. ‘सत्य’ नाताळ विशेषांकाचे संपादक डेव्हिड काळे यांनी गुड समॅरिटन ग्रुपच्या विविध कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.
काव्य संमेलनात बिशप प्रदीप वाघमारे, लाझरस सूर्यवंशी, सुलोचना इंगळे, आनंद चोपडे, प्रदीप भारशंकर, रामचंद्र गुरव, दीपक अमोलिक, नितीन खंडागळे, अविनाश काळे, ॲड. अंतोन कदम, पौलस वाघमारे, रुपाली लोंढे, देवाशिष पेहलवान आदींचा समावेश होता. या कार्यक्रमास रेव्ह. सॅमसन चोपडे, वनिता पिल्ले, विल्यम चंदनशिव, ॲड. विवेक दौंदे, बिशप मायकल राज नाडर, शौल कांबळे, लॉरेन्स जाधव, जेम्स साळवे, दिनकर काळे, मनोज पिल्ले उपस्थित होते. ज्योती सूर्यवंशी आणि बन्यामीन काळे यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक डेव्हिड काळे यांनी केले.