निराधार योजनाचे लाभार्थी वाढून यवतमाळच्या महागाव येथील तात्कालीन तहसीलदाराने 65 लाख तीस हजार रुपयांचा घोळ घातल्याची माहिती विभागीय चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी राम मुळे यांनी हा अहवाल कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्याकडे सादर केला आहे.
nashik-kasmade-वाढत्या तापमानाचा कांद्याला फटकानाशिकच्या कसमादे पट्ट्यात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणवर कांद्याची लागवड केली आहे,मात्र गेल्या काही दिवसां पासून तापमानाचा वाढलेल्या पा-याचा फटका कांदा पिकाला बसला असून उष्णतेमुळे कांदा पात पिवळी पडून त्यावर करपा रोगाचा प्रार्दुभाव वाढून कांद्याच्या उत्पादनात घट झाली असून एकरी १८० ते २०० क्विंटल निघणा-या क्षेत्रात आता ८० ते ९० क्विंटल उत्पादन निघत असल्याने शेतकरी चिंताग्रास्त झालाय
Navi Mumbai : नवी मुंबई मनपाची विक्रमी मालमत्ता करवसुली.नवी मुंबई मनपाने पहिल्यांदाच ओलांडले 800 कोटी करवसूली रक्कमेचे उद्दिष्ट.
गत वर्षी पेक्षा 20% अधिक मालमत्ता करवसुली.
करभरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आयुक्तांनी मानले आभार.
सन 2024-25 वर्षात मालमत्ता करापोटी 826.12 कोटी, पाणी पुरवठयापोटी 105.93 कोटी व
बांधकाम परवानगीपोटी 381.90 कोटी झाले जमा.
नागरिकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास होणार मदत.
Marathi Breaking Live Marathi : राजू शिंदे यांनी दिला राजीनामाछत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी दिला राजीनामा
भाजपमधून राजू शिंदे यांनी ९ नगरसेवकांसह केला होता उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश
आता पुन्हा सर्व समर्थकांसह राजीनामा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले पत्र
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत दिला राजीनामा
पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून आता मनसे आक्रमकराज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसे एक्टिंग मोडवर
"आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला" असल्याचे फ्लेक्स खुलताबाद कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावर लावले.
औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे आहे, औरंगजेब कबर किती किलोमीटर वर आहे हे दाखवले गेले आहे.
क्रांतीचौक पासून 27 किमी
जिल्हा न्यायालया पासून 26 किमी
बाबा पेट्रोल पंप पासून 25 किमी
होली क्रॉस शाळा 24 किमी
नगर नाका 23 किमी
पडेगाव 21 किमी
शरणापूर 14 किमी
असे किलोमीटर दर्शविणारे बॅनर मनसेच्या वतीने लावण्यात आले आहे, जेणे करून प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपल्यावर आलेल्या शत्रूंना इथे कुठे गाडले गेले आहे ते.
Nagpur News Live Updates : नागपुरात मध्यरात्री दोन वाजताच सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस- दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं तापमान 5.5 अंशाने खाली आल्यानं मिळाला होता दिलासा..
- तेच मध्यरात्री सोसाट्याचा वाऱ्यासह शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्या..
- आजही हवामान विभागकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही भागात गारपिटीचा इशारा दिला आहे.
- नागपूरसह विदर्भात चाळीस पार गेलेला पारा ढगाळ वातावरणा मुले खाली आल्यानं काहीसा दिलासा मिळाला.