मुंबई : आर्थिक अडचणींमुळे अनेक जण पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज बँकांकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून घेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. वित्तीय उत्पादनांपैकी सर्वाधिक मागणी असलेला कर्ज प्रकार वैयक्तिक कर्ज आहे. सामान्यपणे लोक वैद्यकीय अडचण, लग्न, घराची दुरुस्ती या इतर मोठ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी पर्सनल लोन काढतात. हे कर्ज विना तारण दिले जातं बँक किंवा वित्तीय संस्था जलद गतीने या कर्जाची प्रक्रिया करतात.
जर तुम्ही पहिल्यांदा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. यामुळे तुमचं कर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते. आज आपण त्या पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या वैयक्तिक कर्ज घेताना फायदेशीर ठरतील.
जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतलं आहे किंवा घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला पहिल्यांदा इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट याचा अंदाज घेणं आवश्यक आहे. इक्विटेड मधली इन्स्टॉलमेंट कॅल्क्युलेट केल्यामुळे तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला दरमहा किती रक्कम मासिक हप्ता म्हणून द्यावी लागेल आणि तुमच्या मासिक उत्पन्नावर त्याचा किती परिणाम होईल.
सध्या अनेक बँका किंवा वित्तीय कंपन्या ईएमआय कॅल्क्युलेटर सारखी सुविधा ऑनलाईन देतात, यामुळे कर्जाचा हप्ता किती भरावा लागेल याची माहिती काढता येते. यामध्ये एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक या बँकांच्या वेबसाईटवर तुम्हाला पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर पाहायला मिळेल. यामध्ये तुम्ही फक्त कर्जाची मुद्दल, व्याजदर आणि किती कालावधीसाठी कर्ज घ्यायचं आहे याची माहिती मिळते. यामुळे तुम्हाला कर्ज परतफेडीबाबत संपूर्ण नियोजन समजतं याशिवाय वित्तीय निर्णय देखील समजूतदारपणे घेता येऊ शकतात.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 वर असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. तुमचा क्रेडिट स्कोअर हे सांगतो की तुम्ही यापूर्वी कर्ज किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट योग्यवेळी केलं आहे की नाही. याशिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरावर देखील कर्ज मिळू शकतं. क्रेडिट स्कोअर वाढवण्याचे पर्याय म्हणजे सर्व जुनी देणी वेळेवर भरा, क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर करू नये, नवे कर्ज काढण्यापासून दूर राहावे.
जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या वित्तीय सवयी सुधारून क्रेडिट स्कोअर वाढवू शकता अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहा. जुनी कर्ज योग्य वेळी परतफेड करा, क्रेडिट कार्ड च्या लिमिटचा कमीत कमी वापर करा, यामुळे तुमचा सिबिल स्कोर हळूहळू चांगला होईल आणि कर्जासाठीची पात्रता देखील वाढेल.
काहीजण एकाच वेळी अनेक ठिकाणी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात, यामुळे त्यांच्या क्रेडिट प्रोफाईलवर चुकीचा परिणाम होतो. जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता त्यावेळेस कर्ज देणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट चेक करतात. याला हार्ड इंक्वायरी असे देखील म्हटले जाते.
तुम्ही जर एकाच वेळी अनेक कंपन्यांकडे कर्जासाठी अर्ज केला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चेक केला जाईल. यामुळे बँकांना वाटतं की तुम्हाला कर्जाची जास्त गरज आहे, यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअर वर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करण्यापेक्षा यापेक्षा एकाच ठिकाणी अर्ज करा जिथे तुमचे यापूर्वीचे पहिले बँक खाते असेल किंवा संबंध असतील. यामुळे तुमचं कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते, क्रेडिट स्कोअर वर देखील परिणाम होत नाही.
अनेक जण दरमहा ईएमआय भरण्याची तारीख विसरून जातात. देशातील मोठ्या वित्तीय संस्था किंवा बँका त्यांच्या ग्राहकांना ऑटो डेबिटची सुविधा देतात. याद्वारे कर्जाचा ईएमआय तुमच्या थेट बँक खात्यातून वजा होऊन कर्ज खात्यात जमा होतो. यामुळे निश्चित तारखेला तुमच्या कर्जाचा हप्ता बँकांकडे जमा होतो.
अधिक पाहा..