Suraj Chavan : सूरजचा स्वॅगच लय भारी; IPLच्या सामन्यात वाजलं 'झापुक झुपूक' गाणं, पाहा VIDEO
Saam TV April 08, 2025 03:45 PM

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी 5'मुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली आहे. सध्या 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन निमित्तच 'गुलीगत किंग' काल आयपीएलची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहचला.

काल (7 एप्रिल) ला 'मुंबई इंडियन्स' विरुद्ध 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' अशी मॅच वानखेडे स्टेडियमवर रंगली. या मॅचमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु'ने बाजी मारली. या मॅच दरम्यान सूरजच्या 'झुपूक' चित्रपटाचे 'झापुक झुपूक' हे गाणे वाजले. याचा खास व्हिडीओ देखील सूरजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किंग कोहली आणि सूरज चव्हाण समोरासमोर पाहायला मिळत आहे.

या खास व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, " किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरा समोर…! पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो आणि आपल्या भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला…! बाकी स्टेडियम मध्ये झापुक झुपूक खऊन वाजलय वीडियो उद्या सोडतो…२५ एप्रिल - झापुक झुपूक तुमच्या जवळच्या थेटरात…!"

सूरज चव्हाणच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सूरज मॅच पाहण्यासाठी हटके लूकमध्ये गेला होता. त्याने 'मुंबई इंडियन्स'ची जर्सी परिधान केली होती. तर स्टेडियमवर तो काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला. त्याच्या शर्टवर 'टॉपचा किंग' असे लिहिले होते. सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं आहे. हा चित्रपट 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.