उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे-नागपूर-पुणे या मार्गावर विशेष वातानुकुलीत (AC) साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी उन्हाळ्याच्या काळात मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात येणार आहे. ज्याने प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही.
गाडी क्रमांक ०१४३९ पुणे- साप्ताहिक विशेष गाडी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान चालविण्यात येणार आहे. ही गाडी प्रत्येक शनिवारी पुणे येथून रात्री ७.५५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहचेल. या गाडीच्या सात फेर्या होणार आहे.
नागपूर-पुणे विशेष गाडी एप्रिल ते २५ मेपर्यंत धावणार आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता नागपूर येथून प्रस्थान करणार असून दुसर्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पुणे येथे दाखल होईल. गाडीला आठ द्वितीय १० तृतीय श्रेणी वातानुकूलित (AC) आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण २० कोच राहणार आहे.
पुणे-नागपूर-पुणे विशेष गाडीला कॉर्ड लाइन,अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि स्थानकावर थांबा राहणार आहे. दोन्ही गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्र व आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर करता येईल, अशी माहिती रेल्वेच्या मध्य विभागने दिली आहे.
Edited By - Purva Palande