लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना गुजरात टायटन्सने कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिल म्हणाला…
GH News April 12, 2025 11:08 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने गुजरात टायटन्सला गुणतालिकेत फटका बसला आहे. पहिल्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला होता. कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 19.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. सहा चेंडूत सहा धावांची गरज होती. अब्दुल समदने पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन आयुष बदोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर बदोनीने चौकार आणि षटकार मारून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा पराभव झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत व्यक्त केलं आहे.

कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘सुरुवातीपासूनच फटके मारणे सोपे नव्हते. एक फलंदाज सेट असेल तर आपल्याला किमान 17-18 षटके खेळू शकतो अशी चर्चा होत होती. जेणेकरून आपण 200-220 हा आकडा गाठू शकू. दोन विकेट गमावल्याने आम्हाला फटका बसला. चेंडू थांबत होता, त्यामुळे त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. मध्यभागी आमचे स्ट्राइक रोटेशन आमच्या अपेक्षेइतके चांगले नव्हते आणि त्यावर आम्हाला काम करण्याची गरज आहे.’

‘विकेट घेण्याचा विचार केला जात होता, हीच चर्चा होती. आम्ही खेळात मागे होतो पण जर आम्हाला 2-3 विकेट मिळाल्या तर सामना खूप खोलात गेला असता आणि ते झाले. आम्ही गोलंदाजी करत असताना 10-11 व्या षटकानंतर थोडे दव पडले होते. चेंडू विचार केल्याप्रमाणे थांबला नाही. जेव्हा तुम्हाला 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता असते आणि जर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला म्हणजे हे आमच्यासाठी चांगले लक्षण आहे. दुसऱ्या टाइमआउटमध्ये आपण हा खेळ शक्य तितक्या खोलवर नेणार आहोत अशी चर्चा होती.’, असंही शुबमन गिल पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.