सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग : नुकतेच नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ‘बीड घटनेपेक्षा भयंकर घटना सिंधुदुर्गमध्ये घडला आहे. आतापर्यंत तिथे 27 हत्या झाल्या असून यातील 9 जण शिवसैनिक आहेत,’ असा दावा त्यांनी केला. आता याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील दोन वर्षांपूर्वीचे एक प्रकरण समोर आले आहे. बीडमध्ये घडलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखेच एक प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. दोन वर्षापूवी कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांची अपहरणानंतर मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना मार्च 2023 मधील घटना असून आता उघडकीस आली आहे. (Sindhudurg Crime simillar case santosh deshmukh murder case)
हेही वाचा : Constitution of India : …तर जालियनवाला बागसारख्या घटना घडतील, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींचा इशारा
समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक बिडवलकर यांचे चेंदवण गावामधील नाईकनगरमधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कुडाळ आणण्यात आले आणि तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह सातार्डा-सावंतवाडी येथील स्मशानभूमीत घेऊ गेले. तिथे सिद्धिविनायक बिडवलकर यांचा मृतदेह जाळण्यात आला आणि त्यांच्या मृतदेहाची त्याची विल्हेवाट लावली, अशी माहिती पोलिसांनी दिल्ली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला.
समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अमोल श्रीरंग शिरसाट याच्या घरात सिद्धिविनायक बिडवलकर यांचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सावंतवाडीमधील सातार्डा येथील स्मशानभूमीत सिद्धिविनायक बिडवलकर यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावली आणि आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले. सिद्धेश अशोक शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर, सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलीस अधिकचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अनधिकृत मद्य व्यवसायातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.