ओझरमधील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिक आक्रमक चांगलेच आक्रमक झालेत. शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावर नगरपरिषदेला जाग येण्यासाठी ओझरमध्ये वारकऱ्यांकडून ओझर नगरपरिषद कार्यालयावर दिंडी मोर्चा काढण्यात आला. स्मशानभूमीत पाणी नाही, वरचे पत्रे उडालेले, गावात विविध ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य अशा वेगवेगळ्या समस्या नागरिकांनी मांडल्या आणि एकनाथी भारूडातून प्रबोधन देखील करण्यात आलं. या आंदोलनानंतर तरी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.
Pune Live: सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलबाहेर बस चालकांचं ठिय्या आंदोलनसिंहगड आरएमडी स्प्रिंगडेल स्कूलबाहेर स्कूल बस चालकांचा ठिय्या. ३७ महिन्यांचा पगार थकवल्याचा आरोप या चालकांनी केलेला आहे. यामुळं पालकही हतबल झाले आहेत.
Nagpur Live : नागपुरात तरुण रेस्टॉरंट मालकाचा गोळ्या झाडून खूननागपूरच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये सोमवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका रेस्टॉरंट मालकाचा खून करण्यात आला. अविनाश भुसारी वय 28 वर्षे असे मृत रेस्टॉरंट मालक तरुणाचे नाव आहे. मृत अविनाश भुसारी याच धरमपेठ परिसरात 'सोशा' नावाचे रेस्टॉरंट आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास अविनाश भुसारी हे बाजूच्या 'निंबस लौंज' चे मालक आणि त्यांचा मित्रासोबत रस्त्यावर बसले असताना दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. आणि त्यांनी अविनाश भुसारी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाश भुसारी यांना लगेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
Bihar Elections Live Updates: आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक होणारबिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक होणार. ही दोन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकांसाठी पहिली औपचारिक बैठक आहे, ज्यात जागावाटप आणि अन्य संबंधित मुद्यांवर चर्चा होईल. १७ तारखेला बिहारमध्ये इंडी आघाडीची बैठक होईल.
Nagpur Live : बोगस शिक्षक भरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेशबोगस शिक्षक भरतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
Buldhana Live : बुलढाण्यात बस आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यूबुलढाण्यामध्ये बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ जण जखमी झाले आहेत.
Pune Live : पुरंदरमध्ये गावठी दारु प्यायल्याने 3 जणांचा मृत्यूपुरंदर तालुक्यातील राख गावात गावठी दारु प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दारु विक्री बंद न झाल्यास आणि तसेच कठोर कारवाई न झाल्यास गावातील तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Nagpur Live : बनावट शिक्षक भरती प्रकरणातील 5 जणांना आज न्यायालयात हजर करणारनागपूरमध्ये 580 शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा आल्याचा प्रकार उघड झाला होता. या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेण्यात आले. या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील 5 जणांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Pune Live : पुण्याच्या तापमानात वाढ होणार, पारा चाळीशीपार पोहोचणारपुण्यात पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उष्मा सहन करावा लागणार आहे.
Sangali Live : भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्लाशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली
Deenanath Mangeshkar Hospital : गर्भवती मृत्यू प्रकरणात आज ससूनचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणारपुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहेत. आज मंगळवारी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार आहे. तसेच या प्रकरणात आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Pandharpur-Vijaypur Highway : उमदीजवळ अपघात; एकजण जागीच ठारउमदी : पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. गुराप्पा सिद्धाप्पा म्हेत्रे (वय ५५) असे मृताचे नाव आहे.
Kolhapur Crime : आई-वडील, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखलकोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विवाह झाला, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. सासरचे काम जमत नसल्यामुळे तिने आत्महत्या केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.
Kolhapur News : आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगावकर यांचे उत्तूरमध्ये निधनउत्तूर : येथील आंतरभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अनंतराव आजगावकर (वय ९५) यांचे निधन झाले. साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाच्या विचारधारेतून तयार झालेली आंतरभारती संस्था खेड्यापाड्यातल्या गरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी स्थापन केली. साने गुरुजींचा खरा विचार पोहाोचवण्याचे काम करणारी संस्था म्हणून आजही त्या शाळेकडे पाहिले जाते.
Lucknow Hospital Fire : लोकबंधू रुग्णालयाला लागली आग; २४ रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखललोकबंधू रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. विपिन मिश्रा म्हणाले, "पाच रुग्ण दाखल झाले असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सर्व विभागातील डॉक्टर काम करत आहेत.'
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली होती, असा दावा निलंबित व वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. याबाबतचा व्हिडिओ कासले याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वाल्मीक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला पाच, दहा कोटींपासून ५० कोटी रुपयांपर्यंतची सुपारी होती, असा दावाही त्याने केला आहे.
Sanjay Ghatge LIVE : माजी आमदार संजय घाटगेंचा आज भाजप प्रवेशकोल्हापूर : जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलेले कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे मंगळवारी (ता. १५) भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.
Salman Khan LIVE : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदमुंबई : ‘अभिनेता सलमान खान याची हत्या निश्चित आहे, घरात घुसून त्याला ठार मारू किंवा त्याची मोटार बाॅम्बने उडवून देऊ,’ असा धमकीवजा लघुसंदेश अनोळखी व्यक्तीने रविवारी (ता. १३) पहाटे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप हेल्पलाइनवर पाठवला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
Mehul Choksi LIVE : फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक, भारतीय तपास संस्थांच्या विनंतीवरून कारवाईLatest Marathi Live Updates 15 April 2025 : अभिनेता सलमान खान याची हत्या निश्चित आहे, घरात घुसून त्याला ठार मारू किंवा त्याची मोटार बाॅम्बने उडवून देऊ,’ असा धमकीवजा लघुसंदेश अनोळखी व्यक्तीने रविवारी (ता. १३) पहाटे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप हेल्पलाइनवर पाठवला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा एन्काउंटर करण्याची सुपारी मला मिळाली होती, असा दावा निलंबित व वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. फरार हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास संस्थांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली. जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलेले कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे मंगळवारी (ता. १५) भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वारकरी संप्रदाय, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दिलेला आध्यात्मिकतेचा संदेश जगात जावा यासाठी पंढरपूर ते लंडन अशी विठुरायाची दिंडी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..