मोताळा : एका व्यक्तीने दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांतता भंग केल्याची घटना मंगळवारी (ता. १५) कोथळी येथे घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोकाँ निलेश शिवलाल राठोड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, तालुक्यातील कोथळी येथील नाझीम शहा हसन शहा (४०) याने दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांतता भंग केली. ही घटना मंगळवारी (ता. १५) दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास कोथळी येथे घडली.
त्याची मोताळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. यावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी नाझीम शहा हसन शहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.