सोन्याची किंमत: सोन्याची (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोटले आहेत. मुंबईत सोन्याचा दर (Mumbai Gold Price) हा 98 हजारांच्या घरात गेला आहे. आज मुंबईत सोन्याचा दर हा 98 हजार 66 रुपये प्रति तोळा होता. मागील एका महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार रुपये प्रति तोळ्यानं वाढ झाली आहे. यामुळं ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे.
17 मार्च रोजी सोन्याचा दर 90 हजार 500 रुपये प्रति 10 ग्राम होता. आता मात्र, दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात सोन्याचा भाव 650 रुपयांनी वाढला आहे. काल संध्याकाळी सोन्याच्या दर मुंबईत 97 हजार 417 रुपये प्रति तोळा होता. दिवसेंदिवस दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
चालू वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कॉमिक्सवरील सोन्याचे फ्युचर्स $3290 च्या वर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाच्या खनिजांवर शुल्क लादण्याबद्दल भाष्य केलं, ज्यामुळे भविष्यात चीनसोबतचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. व्यापार युद्ध एका नवीन पातळीवर पोहोचत असल्याची चिंता वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेत भौतिक खनिजांचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, ज्यावर आता चीनचे वर्चस्व आहे. परस्पर शुल्क आणि ऑटो शुल्कावरील 90 दिवसांच्या सवलतीमुळे सध्या ही तेजी दिसून येत आहे. याशिवाय, मध्यवर्ती बँकांकडून सोने सतत खरेदी केले जात आहे. 2022 मध्ये मासिक सरासरी खरेदीची बेसलाइन सुमारे 17 टन होती, जी आता सुमारे 80 टनांपर्यंत गेली आहे. दरम्यान सोन्याची ही भाववाढ पुढेही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सोन्याच्या दारत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोने खरेदी विक्री क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर जाऊ शकतात. त्यामुळं या वाढत्या दरात सर्वसामान्य खऱेदीदारांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..