आयपीएल 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. 16 एप्रिलला झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघात चढाओढ पाहायला मिळाली. सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. परिणामी सामना बरोबरीत राहिला आणि सुपर ओव्हरद्वारे विजेता निश्चित झाला. दिल्लीने सुपर ओव्हर मध्ये राजस्थानवर मात केली आणि पाचवा विजय साकारला. मात्र या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिट्ल्सच्या बॉलिंग कोचला अंपायरसोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने दिल्लीच्या बॉलिंग कोचवर कारवाई केली आहे.
सामन्यादरम्यान मुनाफ पटेलला राग अनावर झाला. त्यामुळे मुनाफ पटेलने अंपायरला चांगलंच सुनावलं. मात्र अंपायरसोबत पंगा घेतल्याने मुनाफ पटेलला महागात पडलं आहे. बीसीसीआयने मुनाफ पटेलला दंड ठोठावला आहे. त्यामुळे पटेलला एका सामन्याच्या मानधनाची 25 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली आहे.
फोर्थ अंपायर आणि मुनाफ पटेल यांच्यात बाऊंड्री लाईनवर वादावादी झाली. अनेकदा कोच हे फिल्डरद्वारे संबंधित खेळाडू किंवा कर्णधारासाठी मेसेज पोहचवत असतात. हे आतापर्यंत अनेकांनी पाहिलं आहे. पटेलही तसंच करत होता. मात्र फोर्थ अंपायरने तसं करण्यापासून रोखलं. पटेलला ही गोष्ट खटकली आणि इथेच राडा झाला. पटेलने फोर्थ अंपायरला सुनावलं. पटेलने अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे बीसीसीआयकने दंडात्मक कारवाई केली. तसेच 1 डिमेरीट पॉइंट दिला.
पटेलने त्याच्याकडून झालेली चूक मान्य केली. मात्र पटेलला नककी कोणत्या कारणामुळे दंड ठोठवण्यात आलाय? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र अंपायरसोबत हुज्जत घातल्यानेच ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.
शांत, संयमी मुनाफ पटेलचा संयम सुटला
दरम्यान बीसीसीआयकडून याआधी दिल्ली कॅपिट्ल्सचा कर्णधार अक्षर पटेल याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अक्षर कर्णधार म्हणून मुंबईविरुद्धच्या सामन्यात ओव्हर रेट कायम ठेवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे बीसीसीआयने अक्षरकडून कर्णधार या नात्याने 12 लाख रुपये वसूल केले.