रोहित पवार: राम शिंदे (Ram Shinde) यांना विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला. मी निवडून आलो हे अनेकजणांना पचत नाही असा टोला आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राम शिंदेंना लगावला. कर्जत नगर पंचायतमध्ये जे राजकारण सुरु आहे, हे मला राजकीय अडचणीत आणण्यासाठी केलं जात आहे. मला धक्का देण्यासाठी हे सगळं सुरु आहे. दबाव भीती अमिष दाखवून हे सगळं केलं जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.
कर्जत नगर पंचायतमध्ये जी सत्ता होती ती आम्ही सर्वांनी मिळून 3 वर्षापूवी आणली होती. आम्ही आमच सरकार आणलं होतं. त्यात सगळ्यात जास्त नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे होते, फक्त 2 भाजपच्या विचारचे होते. आताच्या नगराध्यक्षाच्या विरोधात त्यांनी एक पत्र दिलं होतं, अविश्वासाचा ठरव त्यांनी मांडला होता. 7 ला पत्र दिलं 8 तारखेला हे पत्र पुढं गेल आणि 9 तारखेला आदेश काढले की 16 तारखेला एक बैठक होईल आणि त्या बैठीत उषा राऊत यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांना त्याचं म्हणणं मांडावं लागणार आहे. सगळी महिनाभराची चौकशी होत असते. ती कलेक्टर घेत असतात पण इथ कायदा बदलला जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सरकारने याबाबत नवीन अध्यादेश काढला आहे. 15 तारखेला एक नवीन अध्यादेश काढण्यात आला आहे. बैठक पुढे ढकलली आहे. नवीन अध्यादेशानुसार परत 21 ला बैठक घेणार आहोत. जिल्हाधिकारी आणि प्रांत यांना सोबत घेऊन राजकारण केलं जात आहे. याची बैठक कुठे झाली तर राम शिंदे याच्या कार्यालयात राजकीय बैठक झाली आहे. फक्त कर्जतबाबत राजकारण केलं जात आहे. सरकार एमआयडीसीसाठी का काही करत नाही असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
पाण्यासाठी इतर विकासकामाचे अनेक प्रस्ताव पडून आहेत. त्याच्यासाठी राम शिंदे काही करत नाहीत. कोर्टाकडूनही न्याय मिळू नये यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. कुरघोड्या काय लेव्हल पर्यंत करायच्या यातून दिसत आहे असे रोहित पवार म्हणाले. राम शिंदे यांनी काहीही करून ठरवले होते की माळी समाजाला धडा शिकवण्यासाठी हे केलं आहे. राजकीय भूमिका घेत येत नसताना हे सगळ केल्याचे रोहित पवार म्हणाले. आज राज्यात अनेक प्रश्न असताना एका नगरपरिषदेसाठी एवढी खटाटोप सुरु होती. हे सरकार राजकीय कुरघोड्या करत आहे का ?असा प्रश्न निर्माण होत असल्याचे रोहित पवार म्हणाले. अनेक काम स्वतः च्या पैशातून करुन सेवा दिली आहे. राम शिंदेंनी विकास निधी थांबवला आहे, विकासकामात अडचणी आणल्याचे रोहित पवार म्हणाले.
दादाच्या स्वागताला अनेक कार्यकर्ते पत्र घेऊन गेले आहेत. अनेक कामे अपूर्ण आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीसाठी निधी हवा आहे. माझे लोक तहानलेले आहेत. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा आहे. मी कॉपी करणार माणूस नाही. बॅनर रोहित पवार मित्र परिवार याने लावले आहेत. 0त्या मित्र परिवाराला मी शोधत आहे असे रोहित पवार म्हणाले. सामाजिक काम आहे. त्याच्या सोयीनुसार काम घेतलं आहे. दादा मतदारसंघात आले त्याचा आनंद आहे. दादांचा चार पाच दिवसात कार्यकम ठरला आहे. माझ्या आज वेगळ्या बैठका ठरल्या होत्या. त्यामुळं मी कर्जतला गेलो नाही असे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..