Ghatkoper Marathi Issue News : मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक, घाटकोपर येथिल घटना
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात गुजराती लोकांकडून मराठी कुटुंबाचा अपमान केल्याची आणि त्यांना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या (Ghatkoper News) या सोसायटीत बहुतांश जण हे गुजराती (Gujrati), मारवाडी समाजातील आहेत. या सोसायटीत फक्त चार कुटुंब मराठी आहेत. त्यामुळे या मराठी कुटुंबांनी (Marathi Family) सोसायटीमधील घर विकावे आणि दुसरीकडे जावे, यासाठी काही गुजराती व्यक्तींकडून मराठी कुटुंबीयांचा छळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरत संबंधित गुजराती आणि जैन कुटुंबीयांना या सगळ्याचा जाब विचारला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणातील आणखी माहिती समोर आली आहे. (Marathi Vs Gujrati)