Lord’s Mark Industries चं एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल; फिलिप्स कंपनीसोबत करार
Marathi April 17, 2025 10:25 PM

Lord’s Mark Industries चं एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल; फिलिप्स कंपनीसोबत करार

लॉर्ड मार्क इंडस्ट्रीजची स्थापना 1998 मध्ये झाली. या व्यवसायाची सुरुवात पेपरपासून झाली, त्याचा व्यापार केला. व्यवसाय वाढत गेल्यानंतर स्टेशनरी प्रिंटींगमध्ये काम सुरु केलं. लॉर्ड मार्क इंडस्ट्रीज शासकीय संस्थांना स्टेशनरी पुरवते. 26 वर्षानंतर एलआयसी, भारतीय रेल्वे, गुजरात वीज मंडळाला स्टेशनरी पुरवण्याचं काम लॉर्ड मार्क करते. 2008-2010  च्या दरम्यान नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात  कंपनीनं पाऊल टाकलं. टेंडर आणि  कराराद्वारे लॉर्ड मार्कनं मोठ्या ब्रँडससोबत काम केलं.  कंपनीनं वेळेनुसार बदलत्या ट्रेंड प्रमाणं काम केलं. एलईडी, सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकलं, फिलिप्स कंपनीसोबत करार केला आहे, अशी माहिती लॉर्ड मार्क इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक मानव तेली यांनी दिली.

लॉर्ड मार्ककडून एलईडी पथ दिव्यांचा प्रकल्प राबवला जातोय. लॉर्ड मार्कनं आता मेडटेक मध्ये काम सुरु केलं आहे. 2020 पासून या विभागात काम सुरु केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनं निर्मिती क्षेत्रात देखील लॉर्ड मार्क काम करत आहे. दुचाकी वाहनांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे. तीन चाकी वाहनांची निर्मिती देखील करतोय. कंपनी भारतीय गरजांचा किफायतशीर दृष्टिकोनातून विचार करून प्रगती करत आहे. सध्या आमचं लक्षं मेड टेकवर आहे, असं मानव तेली म्हणाले.

लॉर्ड मार्क यांनी बाजारातील ट्रेंड, फोकस आणि गरजांवर आधारित मेड टेक नावाच्या परवडणाऱ्या आरोग्यसेवेची कल्पना केली. किफायतशीर डायग्नोस्टिक चाचण्या, सामान्य माणसांसाठी डायग्नोस्टिक टेस्ट  लॅब असणं आवश्यक आहे. त्यातून लॉर्ड मार्कनं काम सुरु केलं.

महाराष्ट्र आणि देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं असेल तर सिंगल विंडो क्लिअरन्स आणि प्रक्रिया फास्ट ट्रॅक करणं गरजेचं आहे. जग आपल्याला पाहतंय. फास्ट ट्रॅक प्रोसेस आणि सिंगल विंडो क्लिअरन्स करणं फायदेशीर ठरेल. लॉर्ड मार्क इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, सौर ऊर्जा आणि एलईडी क्षेत्रात काम करतेय. लॉर्ड मार्क सरकारसोबत काम करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.