बालकामगार प्रकरणात दोघांवर गुन्हा
esakal April 18, 2025 05:45 AM

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर)ः भिवंडी शहरातील हॉटेलमध्ये बाल कामगारांकडून काम करून घेतल्याप्रकरणी दोन हॉटेलचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतिनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला होता.
जब्बार कंपाउंड येथील अमन हॉटेल व गरीब नवाज हॉटेल येथे हॉटेलमध्ये बालकामगार असल्याची तक्रार नवी मुंबई येथील देवय्या गंगाराम अरीकेल्ला यांनी केली होती. याप्रकरणी शांतिनगर पोलिसांच्या मदतीने दोन्ही हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता. या वेळी १२ व १४ वर्षीय बालकामगार असल्याचे आढळून आल्याने अमन हॉटेलचालक सिराजुद्दीन निज्जामुद्दीन अन्सारी तसेच गरीब नवाज हॉटेलचालक औरंगजेब मुज्जमील हुसेनविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५चे कलम ७५ व ७९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.